दातारांचा त्रिपूर

  • 1.2k
  • 1
  • 436

        दातारांचा त्रिपुर         तिन्हीसांजा होत आली अन् डोक्यावर सामानाचे पेटारे घेतलेली दशावतारी मंडळी निव्यात म्हादू पेंढारकराच्या खळ्यात डेरेदाखल झाली.दाढी मिशा सफाचट केलेले, बाईल माणसासारखे लांब केस वाढवून त्यांचा आंबाडा बांधलेले, डोळ्यात काजळ घातलेले बापयेबघून अचंबीत झालेली घाडी, परब नी गुरवांची पोरेटोरे दशावताऱ्यांच्या तांड्या सोबत म्हादू काकांच्या घरापर्यंत आलेली. म्हादूकाका पडवीतल्या झोपाळ्यावर बसून पान सुपारीचा पितळी डबा उघडून पान जमवीत बसलेला.दशावतारी आंगणात येवून उभे राहिल्यावर स्वयंपाक घराकडे तोंड वळवण्याची तसदीही न घेता ओरडला,“ हऽऽय , भाग्ये ऽ दशात्री आलेत गो.... त्यांचे साटी पाण्याची कळशी - तांब्या नी  गुळाचे खडे घाडा बाहेर.....”    म्हादुकाकाची बायको  बारा बाळंतपणे होवून टेकीला आलेली. त्यात दूध