बियाण्याचा कोंबडा

  • 3k
  • 1
  • 1.1k

         बियाण्याचा कोंबडा                        तीन कच्चीबच्ची पोरं काशीच्या गळ्यात टाकून लखू धनावडा मेला.दोन कलमं आणि जेमतेम पाच मण भात नी दीड दोन मण नाचणे पिकतील एवढी  तुटपुंजी जमीन....... पण काशी डगमगली नाही.  जोताचे दोन बैल, दुभती गाय नी तिची दोन वासरं असागुरांचा बारदाना ती निगुतीने सांभाळायची. त्यांच्या जोडीला सदू भटाकडून दोन रेड्या पोसणीला आणल्या.तिला ढोरा वासरांची मुळात चांगली हदन. तिची गाय लिंबासारखी टुकटुकीतअसायची. उन्हाळी सड्याशिवराला जावून ती आईन, धामण, हसाणी, बिवळा, पिंपळ असा झाडांचा वेंगाटभर पाला आणी. लांब लचक आवती काठीच्या टोकाला चारीची लखललखीत कोयती बांधून उंचावरच्या पाल्याचे टाळे कापी. पावसाळी भटांची आगरं साफ़ करून देण्याच्या बोलीवर चार