योजना लाभासाठी की देश विकासासाठी?

  • 966
  • 336

*आश्वासने ही लाभासाठी की देशाच्या विकासासाठी?*         *आगामी वीस तारखेला विधानसभा निवडणूक होवू घातलेली आहे. निवडणूक पक्ष जनतेला मतदान करायला लावत आहेत. त्यासाठी मागील लोकसभेसारखी जनजागृती देखील करीत आहेत. लोकांनी मतदान करावे म्हणून ही जनजागृती आहे. शालेय स्तरावरही विद्यार्थ्यांच्या मार्फत जनजागृतीपर काही उपक्रम राबविण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना राजकारणापासून दूर ठेवावे असा कयास असतांनाही आताही विद्यार्थी आपला अभ्यास सोडून सर्वांनी मतदान करावं हे आवर्जून सांगणार आहेत. त्यासाठी भित्तिपत्रकासह विविध उपक्रम शाळेचे विद्यार्थी राबविणार आहेत. हे सर्व प्रयत्न मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आहे. नेतेही निवडणूकीत निवडून येण्यासाठी आश्वासने देत आहेत. मी अमुक करेल मी तमूक करेल. मात्र ही आश्वासनं लाभ