नियती - भाग 30

  • 2.4k
  • 1.5k

भाग 30मोहित आता गंभीर होऊन मायराला म्हणाला...."मायरा.... आपण कोर्ट मॅरेज करायचं.... की मंदिरात लग्न करायचं.... काय ठरवलं आहे सांग मला... कारण दिवस कमी राहिले... मी आई-बाबांशी बोलून घेतो या विषयावर... तुही तुझ्या बाबांशी वगैरे बोलून घे..."त्यावर तिने केवळ हुंकार दिला....  त्या विषयासंबंधीत चर्चा करून झाल्यानंतर त्याच मार्गाने मोहित परतला...आणि घरी पोहोचला तर.......दुरून त्याला घराच्या अंगणात त्याचा मामा आणि मामी दिसली.   मामा आणि मामी खाटेवर बसून होते.आई त्यांच्यासमोर पाटावर खाली बसून होती.. आणि बाबा दरवाजाजवळ एका स्टूलवर बसलेले पाहिले....तो दूरूनच विचार करू लागला की काय झाले असेल...?? कारण त्याला त्याची आई पदराने अश्रू पुसतांना दिसली...तो मंद पावले टाकू लागला....तेवढ्यात त्याच्या बाबांना