चाळीतले दिवस - भाग 7

  • 2k
  • 1.1k

चाळीतले दिवस भाग 7 दिवसेंदिवस माझे नागपूर चाळीतले मित्र संख्येने वाढत होते.अशोक शिर्केच्या खोलीत त्याच्या चुलत्याच्या ऑफिसात काम करणारा एक मळ्याली तरुण रहायला आला होता.शशीधरण नावाचा तो तरुण बॅचलर होता आणि माझ्यासारखाच स्वतः स्वयंपाक करून खायचा.  या शशी ला वाचनाची आवड होती,जास्त करून इंग्रजी पुस्तके  तो वाचायचा.त्याला थोडेफार हिंदी बोलता येत होते.माझे आणि त्याचे बऱ्यापैकी सूर जमले होते.तो तांदळाचे विविध पदार्थ करायचा.आपल्याकडची भाजी भाकरी त्याला आवडायची. वेळ असेल तेव्हा दिलीप आणि अशोक शिर्के बंधू यांच्याकडची तांदळाची भाकरी आणि सुकी मासळी,शशीचा केरळी स्वयंपाक आणि माझी भाजी भाकरी आम्ही एकत्र येऊन मस्त गोपालकाला करून खायचो.सणासुदीला बाळू नितनवरेची आई मला हमखास पुरणपोळी खायला बोलावायची.त्या चारपाच वर्षात