लक्ष्मीपूजन अलक्ष्मीचा प्रवेश?

  • 1k
  • 327

*लक्ष्मीपुजन ; आपल्या घरात अलक्ष्मीचा प्रवेश? शक्यच नाही.*            *दिवाळी...... दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन करतो. त्यासाठी घराची साफसफाई करतो. अंगणात रांगोळ्या टाकतो. सुग्रास अन्न बनवतो. झाडांची खांब, पानं लावतो. घर सजवतो. वाटतं की लक्ष्मीची अशी पुजा केल्यानं आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न होईल. पैसाही येईल. शिवाय अशी पुजा केल्यानं पैसाही येत असतो अतोनात. परंतु तो पैसा आपल्या पापकर्माचं द्योतक असतो. जे पापकर्म आपल्या हातून घडत असतात. ज्यातून घरात रोगराई प्रवेश करीत असते. पर्यायानं सांगायचं झाल्यास अलक्ष्मीच घरात प्रवेश करीत असते. लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन बहिणी. आपल्या हातून लक्ष्मीची चांगली पुजा झाली तर आपल्या घरी लक्ष्मी नांदत असते. जी