मुक्त व्हायचंय मला - भाग ११

  • 2.4k
  • 1.3k

मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं ऐकून कितीतरी वेळ माधव आणि सरीता विचारात हरवले.मालती बराच वेळ दोघांचे चेहरे निरखत होती. दोघांनाही हे सत्य पचवणं जड जाणार आहे हे मालतीला आधीच लक्षात आलं होतं. "मुलांनो तुम्ही वेळ घ्या विचार करायला.मी मात्र घेतलेला निर्णय अंमलात आणणार आहे. मी एक घर परवाच पक्कं करून आले आहे.माझा भाऊ म्हणजे तुमचा मामा माझ्याबरोबर आला होता.मी वेगळी राहिले तर मला माझ्या माहेरच्या लोकांना मोकळेपणाने भेटता येईल. माझे आईवडील आता खूप म्हातारे झाले आहेत त्यांना मला काही दिवस तरी माझ्या घरी आणता येईल. मी लग्न झाल्यापासून माझ्या आईवडिलांना सुद्धा मनमोकळे भेटले नाही. तुम्हाला यावंस वाटलं तर