एक दिवाळी अशी ही..!

  • 2.2k
  • 827

गेल्या 27 वर्षात पहिल्यांदा  दिवाळीला  घरापासून लांब आहे, काल रात्री असाच अचानक घरून फोन येऊ लागले, दिवाळी आहे कधी येतोयस,  आणि यावर्षी पहिलीच वेळ दिवाळीला घरापासून लांब रहाव लागतय, अगदी कारण ही तसंच आहे, इलेक्शन समोर येऊन टेकलेत, माझ्यासारखच खूप साऱ्या पॉलिटिकल कॅम्पेन मध्ये काम करणाऱ्या लोकांच अगदी असच असेल. आई, भाऊ ,काकी,माई सर्वांचेच फोन येऊन गेलेले, यावर्षी दिवाळीला नाही येणार अस बोलायला पण मला खूप जड जात होत, पण तस बोलून मी फोन ठेवून दिला. एव्हाना संध्याकाळ होत चालेली, मी टेरेस वर तसाच बसून राहिलो, आता मात्र आजूबाजूला लक्ष गेला, बाजारामध्ये खरेदीसाठी लोकांची  जमलेली गर्दी , फटाक्याचे स्टॉल, सर्वत्र