मराठी शुद्धलेखन ह्रस्व - दीर्घ चे सोपे नियम.

  • 666
  • 213

शुद्ध लेखनआपल्या शालेय जीवनात आपल्याला शुद्धलेखनाची पहिली ओळख होते. त्यात सगळ्यात प्रथम आणि आपल्याला लक्षात न राहणारा आणि न समजणारा असा विषय म्हणजे ह्रस्व- दीर्घ चे नियम.प्रत्येकाला आपल्या शालेय जीवनात जे शिक्षक लाभले त्यांनी त्यांच्या परीने हे नियम समजावून सांगितले परंतु आपल्या त्या वयानुसार ते नियम समजणे अवघड गेलं पुढे आपण मोठे झाल्यानंतर स्वतः लिखाण करायला लागलो त्यावेळेला ही नियम लक्षात राहत नाहीसे झाले. शिक्षकांनी शिकवलेल्या ह्रस्व दीर्घ च्या नियमातला वाटायला साधा पण आम्हाला त्यांना अवघड असा नियम म्हणजे ज्या शब्दाचा उच्चार पटकन होतो तो ह्रस्व लिहायचा आणि या शब्दाचा उच्चार लांबवला जातो तो दीर्घ लिहायचा. परंतु प्रत्यक्षात एखादा शब्द