परिस मेळ्ळो

  • 2.1k
  • 2
  • 675

परीस मेळ्ळो घाटी चढल्यावर शेवटच्या मोडणाला रात्या आंब्याखाली तानू देवळी दम खायला थांबला. बानघाटी म्हणजे मोडणा मोडणानी वर गेलेली जीवघेणी चढण. त्यात पावसाने चढणीचे दगड बुळबुळीत झालेले. सड्यावर यायला जवळची वाट म्हणून तानू या घाटीने आला. दम जिरल्यावर तो पुन्हा चालीला लागला. धारेपर्यंत आल्यावर घाटी संपली आणि सड्याची सपाटी सुरू झाली. धारेपासून पाच कोस औरस चौरस टापू म्हणजे नुसती सडावळ! कुडा, आंजण, पंचकोळी, उक्षी अशा गोड्या आणि करंदी, तोरणी, वाघेरी अशा काटेऱ्या झाळी नी अधून मधून चुकार एखादे वड, पिपंळ