मुक्त व्हायचंय मला - भाग १

(11)
  • 10.2k
  • 1
  • 5.9k

“  मुक्त व्हायचय मला ’’ भाग १‘हॅलो......’ सरीताचा आवाज ऐकताच तिची आई म्हणाली, ‘"सरिता तुला वेळ आहे का?""कशासाठी?" सरीतानी  आईला प्रतिप्रश्न केला. "तुझ्याशी बोलायचं’’ आई“तुला माझ्याशी बोलायचय?” सरिताच्या आवाजात आश्चर्य होत.“ हो” आई म्हणाली. “तुझ्याशी आणि माधवशी दोघांशी बोलायचं आहे.”आई“बापरे!....दोघांशी बोलायचंय. आई काही गंभीर आहे का?” “ते भेटल्यावर कळेल” “ बरं  मी घरी येते.” “घरी नको..आपण बाहेर भेटू.”“का?” आईच्या बोलण्यानी सरीता गोंधळली. तेवढ्यात आई म्हणाली, “आपल्या घराजवळच्या  कॉफी हाउसमध्ये भेटू.चल ठेवते.”आईनी फोन ठेवल्यावर सरीता विचार करू लागली की आईला काय बोलायचं असेल? कारण,एवढ्या आयुष्यात तिला कधीच बोलतांना पाहिलं नाही, बोलायचे फक्त बाबा ....विचार करून डोकं दुखायला लागल्यावर तिने नाद सोडला आणि माधवला फोन लावला.***