स्वातंत्र्य - भाग 3

  • 1.1k
  • 411

स्वातंत्र्य भाग तीन          शिवरामले खंत वाटतच होती. त्याले वाटत होतं का आपली जात हे उच्च जात नाई. त्यातच आपल्यावर त्या लोकाईनं अत्याचार केलेत. परंतु आता आपण स्वतंत्र हाओत. आपल्याले बाबासाहेबाईनं स्वतंत्र्य केलं, आपल्या हाडाची काडं करुन. ते बाबासाहेबाईचेच उपकार हायेत आपल्यावर. परंतु आपण स्वतंत्र्य झालो असलो तरी ते स्वतंत्र्य होणं येथल्या उच्चवर्णीय लोकाईले खपत नाई. म्हणूनच भांडण होतेत. परंतु याचा अर्थ आपण भांडण करावं असा होत नाई. आपण काल भांडलो इंग्रजाईशीन. कारण आपल्याले त्या काळात नेत्याईनं सांगतलं होतं का आपल्यावर इंग्रज लोकं अत्याचार करतेत. परंतु ते अत्याचार करत नोयते तं ते सुधारणा करत होते. तो एक नवा