स्वातंत्र्य - भाग 1

  • 2.8k
  • 1.3k

शिवराम, संपत, रामा, तिमा अन् सोमा व शंकर असे ते मित्र. त्याईचीबी दाट मैत्री होती. एकप्रकारे लोखंडाचे तुकडे होतीन. परंतु त्याईच्या मैत्रीचे तुकडे होणार नाई अशी त्याईची बालपणीची मैत्री होती. ते सगळेच बालपणात एकाच शाळेत जात होते. त्यातच शिक्षणाचं महत्व असल्यानं त्या सप्प्याईच्या मायबापाईनं त्याईले शाळेत टाकलं होतं. मात्र संप्यावर बाबासाहेबाईच्या ईचाराचा प्रभाव पडला अन् तो शिकत गेला व लयच मोठा झाला होता. त्यातच राम्याबी थोडासा कमीच शिकला होता.  शिवराम थोडा जास्त शिकला होता तं सोमा सात वर्ग. तिमा शिकला होता दोन वर्ग. सोम्यानं आपल्या बापाचाच धंदा पकडला होता तं राम्यानंबी आपल्या बिरादरीतलाच धंदा पकडला होता. ते दोघंबी बक्कळ पैसा