संविधान आहे म्हणून ठीक आहे

  • 1.7k
  • 672

संविधान आहे म्हणून ठीक आहे           *बदलापूर बलात्कार कांडातील आरोपी अक्षय शिंदे. असाच की ज्यानं पोलिसांची बंधूक हिसकावून घेतली व ज्यात त्यानं पोलिसांवर बंधूक रोखली. ते पाहून पोलिसांनी प्रसंगावधान साधून त्याला इनकॉऊंटरमध्ये मारलं. तो मारला गेला. परंतु त्या घटनेनं संबंधीत बदलापूरच्या बलात्कार घटनेतील आरोपींना अभय मिळणार? ही शक्यता नाकारता येत नाही. शिवाय पोलिसांच्याही कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्हंच उभं राहिले त्या प्रकरणानं. जणू हेही प्रकरण सिद्ध करते की आज संविधान आहे. पण संविधानाला आम्ही मानत नाही. घाबरत नाही. कालचा बलात्कार याचंच उदाहरण आणि आजचं इन्कॉऊंटर याचंच उदाहरण. या प्रकरणाने जणू संविधान असण्यावर प्रश्नचिन्हंच निर्माण झाले असल्याचे दिसत आहे.*