सन्मान प्रेतालाही मिळावा?

  • 1.2k
  • 450

*सन्मान आपल्याला नाही तर आपल्या प्रेतालाही मिळावा?*          *सन्मान...... सन्मान आपल्यालाच नाही तर आपल्या प्रेतालाही मिळावा. त्या प्रेताचाही विशिष्ट पद्धतीनं दाह संस्कार व्हावा. चार पाहूणे गोळा व्हावेत. ते रडावेत. हे तेव्हाच घडू शकतं. जेव्हा आपल्या हातून बालपणापर्यंतचे कर्म चांगले घडत असतात. परंतु आपण बालपणापासूनच कर्म चांगले करीत नाहीत. जसं बालपणात आपण गंमत येते म्हणून फुलपाखरांची हत्या करीत असतो. झाडांना तोडत असतो. सरड्यांना तंबाखू चारत असतो. मोठे झाल्यावरही कित्येक माणसांना त्रास देत असतो. शब्दांचा मार देत असतो नव्हे तर हत्याही करीत असतो. आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकत असतो. त्यावेळेस विचार करीत नाही की आपल्याला या कर्माचे वाईट भोगमान भोगावेच लागतील.