मैत्री

  • 1.4k
  • 624

मैत्री         मैत्री कधीही गोडीगुलाबीची असावी.त्यात गोडवा असावा साखरेसारखा.ती उसाप्रमाणे असावी. कितीही पिरगाळला,कितीही ठोकला.तोडला तरी ज्या उसाचा गोडवा कधी समाप्त होत नाही.तशी मैत्री असावी व मैत्रीचं नातंही तसंच असावं.          सुलभा सांगत होती महेशला,नव्हे तर मार्गदर्शन करीत होती.तिची मित्रता होती महेशबरोबर ब-याच दिवसापासून.त्याची मैत्री तुटू नये कधीच असं तिला वाटत होतं.म्हणून ती बोलत होती.त्या दोघांचं कोणत्यातरी कारणावरुन भांडण झालं होतं.म्हणून त्याला समजविण्याचा तिचा अल्पशः प्रयत्न.         चांगल्या माणसाच्या सोबतची मैत्री ऊसा सारखी असते ,ठोका ,मुरगळा,तोडा,त्यामधून गोडवाच मिळतो.माणसाचे जीवन हे सुख दु:खाच्या आरशाच्या काचेसारखं आहे.एकीकडे सुख असतं.दुसरीकडे दुःख.पण पारा लावलेला असल्यानं पलिकडचं सुख कोणाला