चाळीतले दिवस - भाग 4

  • 2.4k
  • 1.3k

भाग 4.    साईबाबाचे मंदिर बांधायची आमच्या मंडळाची कल्पना वस्तीतल्या लोकांना चांगलीच आवडली होती.लोक स्वतःहून यासाठी वर्गणी देऊ लागले.जिथे आम्ही मंदिराचे नियोजन केले होते ती रस्त्याच्या बाजूचा साधारणपणे पंधरा फूट बाय वीस फुटाची जागा होती.जमा झालेल्या वर्गणीतून मंदिराचे बांधकाम सुरु झाले.दरम्यानच्या काळात चंद्रसेन निकम ज्यांना आम्ही बापू म्हणायचो,त्यांच्या पुढाकाराने साईबाबा दिवाळी फंडही सुरु झाला.प्रत्येक सभासदांने काही वर्गणी जमा करायची आणि गरजू व्यक्तीला कर्ज द्यायचे अशी ही व्यवस्था होती.मी शिकत असल्याने या फंडाचा सभासद मात्र होऊ शकलो नव्हतो.  मी स्वतः स्वयंपाक करून खायचो.बऱ्याच वेळा स्वयंपाक करायचा खूप कंटाळा यायचा अशावेळी इस्माईल भाई पठाण यांच्या बेकरीतून मी छोटा ब्रेड आणि अंडे विकत आणायचो आणि