अजून ही बरसात आहे ..... - भाग 6

  • 3.3k
  • 2.4k

अर्जुन ऑफीस वरून घरी आला होता .... खूप दमला होता ....अर्जुन घरी येताच त्याची कमवाली बाई ही कबीर ला त्याच्या कडे सोडून घरी जायला निघाली ......अर्जुन खूप दमला होता .....एक ग्लास पाणी तरी कोणीतरी द्यावे ....एवढीच त्याची इच्छा होती ...         पण निशा कडून अशी अपेक्षा ठेवणे ही व्यर्थ होते ....निशा आत मध्ये बेडरूम मध्ये कोणाशी तरी बोलत होती ......अर्जुन ला वाटले तिच्या कोणत्यातरी मैत्रिणीशी गप्पा मारत बसली असेल म्हणून त्याने फार लक्ष नाही दिले ....पण बेडरूम मधला आणखी एक येणारा आवाज त्याच्या ओळखीचा वाटला....म्हणून किचन मधून जाता जाता त्याने बेडरूम मध्ये नजर वळवली .......ती दुसरी व्यक्ती पाहून