चाळीतले दिवस - भाग 3

  • 2.9k
  • 2k

भाग 3   आमची नागपूर चाळीतली खोली खूपच छोटी होती.चारी बाजूनी पत्र्याच्या भिंती आणि वर मंगलोरी कौलाचे छत होते.एका बाजूला साळुंके नावाचे कुटुंब रहात होते. समोरच पाण्यासाठी सार्वजनिक नळकोंडाळे होते. नळ कोंडाळ्याला चार पाण्याच्या तोट्या होत्या. पाणी एकदा आले की आजूबाजूच्या सगळ्या बायका पाणी भरायला,धुणे धुवायला कोंडाळ्यावर जमायच्या. त्यांच्यातल्या गप्पा, एकमेकींच्या चुगल्या तर कधी कधी भांडणे पाणी बंद होईपर्यंत चालू असायची.मला खोलीत बसल्या बसल्याही बाहेरचे बोलणे ऐकू येत असे. यातूनही छान मनोरंजन व्हायचे. खोलीच्या समोर थोडया अंतरावर चारीबाजूनी बारदाणा लाऊन आडोसा करून आंघोळीसाठी मोरी केलेली होती. तिथेच पाण्याचा मोठा ड्रम भरून ठेवलेला होता.जवळ जवळ प्रत्येकाच्या खोलीसमोर अशीच व्यवस्थ्या होती.मी इथे राहायला आलो