क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग ५

  • 1.8k
  • 910

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला. भाग पाचवा.मागील भागावरून पुढे…निखील आणि अपर्णा यांचं लग्न होऊन आता दोन महिने होत आले होते. सगळं घर आलेल्या नवीन सदस्यामुळे आनंदी होतं. अपर्णा होतीच तशी लाघवी. सगळ्यांना धरून चालायचं हे आई वडिलांनी तिन्ही मुलींच्या मनावर छान बिंबविलं होतं.अपर्णा आईवडिलांनी शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेऊन वागत होती. त्यादिवशी दुपारी सगळे जेवायला बसले पण अपर्णा चं ताट न दिसल्याने निखीलच्या आईने विचारलं," अपर्णा तुझा उपवास आहे?" निखील च्या आईनी विचारलं." नाही.का?" अपर्णा नी उत्तर दिलं." अगं मग तुझं ताट नाही इथे."" आई तुमचं सगळ्यांचं होऊ द्या मग मी जेवीनं." अपर्णा म्हणाली." तू का शेवटी जेवणार?" निखीलच्या बाबांनी