त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग ५ (अंतिम भाग)

  • 1.6k
  • 737

या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग ५(अंतिम भाग)मागील भागात आपण बघीतलं की मृदुला कृपाच्या घरी गेली होती. आता बघू या भागात काय होईल ते.मृदुला कृपाच्या घरून निघाली तीच मुळी गलीतगात्र होऊन. मृदुला कशी तरी गाडीपाशी आली. कितीतरी वेळ तिला गाडीची किल्ली सापडेना. पर्समधील सगळ्या खणांमध्ये शोधून तिला किल्ली सापडेना. ती किल्ली शोधताना थकली आणि उभ्या उभ्या तिला रडू कोसळलं.पाच दहा मिनिटांनी तिचा उमाळा थांबला. तिने पुन्हा पर्समध्ये किल्ली शोधली. किल्ली सापडताच तिला हायसं वाटलं. किल्लीने कारचं दार उघडून ती ड्रायव्हिंग सीटवर बसली. कार सुरू करण्यासाठी किल्ली लावताना तिचा हात थरथरत होता. मृदुलाला आश्चर्य वाटलं ते याचं की आजपर्यंत