त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग ४

  • 1.6k
  • 774

या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग ४मागील भागात आपण बघीतलं की मृदुलाला कृपाच्या घरी जाण्याची हिंमत होत नसते. बघू मृदुला हिंमत करू शकते का?मृदुला जरा सावरली आणि कृपाकडे जायचं म्हणून उठली. तयार झाली निघताना पायात चप्पल घालताना पुन्हा तिचे पाय अडखळले. तिच्या पायात गोळे आले. क्षणभर ती भिंतीचा आधार घेऊन उभी राहिली. तिने डोळे मिटून घेतले होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू धारा पुन्हा सुरू झाल्या.मृदुलाच्या सासूबाई तेवढ्यात बाहेरच्या खोलीत आल्या आणि त्यांना भिंतीचा आधार घेऊन निश्चल उभी असलेली मृदुला दिसली. तिच्या गालावर अश्रूंचे ओघळ दिसले. त्यांच्या लक्षात आलं की मृदुला अजूनही कृपाकडे जाण्याची हिंमत करू शकत नाहीय. त्या