रखमा आजी.. एक अज्ञात जग

  • 7.1k
  • 3k

रखमा आजी.. एक अज्ञात जग...   मी जेव्हा अकरावी बारावी साठी KTHM नाशिक येथे होतो.. तेव्हा माझा एक रूम पार्टनर होता... ही घटना त्याने मला सांगितली होती.. गुरुनाथ पाटील त्याचे वडील.. त्यांच्या बाबतीत घडलेला हा किस्सा.. आता हा किती खरा आणि किती खोटा हा त्यांनाच माहीत..    हि 1982 सालाची गोष्ट आहे...गुरुनाथ पाटील नुकतेच पदवी पास झाले होते. . काही ठिकाणी अर्ज पाठवल्यानंतर, त्यांना समुद्राच्या आसपासच्या दुर्गम भागातील एका सोनेवाडी नाव असलेल्या गावात, आश्रम शाळेत शिक्षकाच्या नोकरीची ऑर्डर आली. नोकरीच्या संधीने ते अतिशय उत्साहित होते. लवकरच त्यांनी नोकरीवर रुजू होण्याचे ठरवले. दोन दिवसातच त्यांनी आवश्यक सामान एका लोखंडी पेटीत भरले,