संगीत करमणुकीचं साधन. पण?

  • 1.3k
  • 411

संगीत करमणूकीचं महत्वपुर्ण साधन, पण?           संगीत हे करमणुकीचं साधन आहे. संगीत जर जीवनात नसेल तर घोळ निर्माण होवू शकतो. संगीत नसेल तर संपुर्ण आयुष्य कंटाळवाणं जात असते. आयुष्यात निरसता व मलिनता येत असते. त्यामुळंच जीवनात संगीत महत्वपुर्ण बाब आहे.        पुर्वी जेव्हा माणसं माकडरुपात होती. तेव्हाही संगीत उपलब्धच होतं. ते माकड प्राणी विशिष्ट असा आवाज करुन आनंद मिळवत असत. त्याचं कारण होतं. त्यांना वाटणारी भीती. ज्यावेळेस त्यांना भीती वाटायची. त्यावेळेस ते विशिष्ट असा आवाज काढत असत. त्याला ध्वनी अर्थात स्वर म्हणून नाव मिळालं. ते त्या प्राण्यांसाठी एक प्रकारचं संगीतच होतं. पुढं त्यात तालबद्धता आली.