नियती - भाग 3

  • 4.7k
  • 4.1k

भाग 3मुकाट्याने मोहित झोपडीत शिरला. बाहेरच्या पेक्षा आत दुर्गंधी अधिक होती. त्याला त्या दुर्गंधीचे काहीच वाटत नव्हते. कारण दुर्गंधी ही नेहमीची सवय झाली होती.तेवढ्यात त्याची लक्ष त्याच्या मामाकडे गेले. मामा अधाश्यासारखा मोहितच्या ठेवलेल्या सिल्वर ट्रॉफी कडे पहात होता एकटक.मोहितचेही लक्ष गेले की मामा आपल्या सिल्वर ट्रॉफी कडे एकटक बघतोय.त्याचे मामा विचार करत होते...."हा चांदीचा कप आहे म्हणतोय मोहित. तर हा कप किती रुपयांना विकता येईल...??"त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मोहित ही समजून गेला की त्यांच्या मनात काय आहे...??...मनीषा काय आहे...???"मोहित्या हे काय आहे...???""मामा ...माझं बक्षीस आहे ते मला मिळाले आहे.""बक्षीस किती रुपयांचा असेल...???"मोहित आता खरच मनातून चरकला. गडबडून त्याने मामाच्या तोंडाकडे