सुवर्णप्राप्ती

  • 1.7k
  • 1
  • 615

             सुवर्णप्राप्तीतेजपाल कपारीजवळ जाऊन उभा राहिला अन् सूर्यास्त झाला. अवघड चढणीचा मार्ग वेगाने पूर्ण केल्यामुळे अति श्रमाने त्याला धाप लागली. खरे तर बसल्या जागी अंग पसरावे इतकी मरगळ आलेली. तथापि या निर्मनुष्य परिसरात रात्र बिनघोर घालविण्यासाठी सुरक्षित जागा पहाणे क्रमप्राप्त होते. म्हणून मरगळ झटकून तो उठला. तो कपारीतून आत शिरला. आत चांगली दोन खण ऐसपैस जागा पाहून त्याला बरे वाटले. आत इतस्ततः विखुरलेली पिसे अन् विष्टा या जागी पक्षाचे वास्तव्य असल्याची सूचक होती. मात्र अवघड चढणीच्या मार्गाने एखादे हिंस्त्र श्वापद इथपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. पिसे अन् विष्ठा यांचे सूक्ष्म अवलोकन करता पक्षी सांप्रत काळी येथे