बलात्कार - भाग 2

  • 2.4k
  • 1.3k

बलात्कार कादंबरी भाग दोन            सुनीता नोकरीवर नियुक्त झाली होती. तिला वेदना देणारा तो नराधम पदोपदी तिला आठवत होता व त्याला शिक्षा केव्हा केव्हा देतो आणि केव्हा केव्हा नाही. असं तिला होवून गेलं होतं. परंतु तसं तिला वाटत असलं तरी त्याची ताकद फार वाढून गेली होती. कारण त्याला आता मंत्रीपद मिळालं होतं. परंतु कायद्यासमोर सगळे अंतरी, मंत्री, संत्री समान असतात. परंतु प्रत्यक्ष पुरावा हवा हेही तिला माहीत होतं.           गुणवंतनं तिच्यावर बलात्कार केला होता हे तिला माहीत होतं व तीच त्या खटल्यातील प्रत्यक्ष साक्षीपुरावा होती व त्या तिच्या खटल्यातील तिच्या झालेल्या तपासण्याही तिच्याजवळ होत्या.