क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग २

  • 2.8k
  • 1.8k

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला भाग दुसरामी पण आता हसत खेळत, एक सुंदर आयुष्य सुरू करायला निघाली आहे.सुखी संसाराची स्वप्नं डोळ्यात साठवून मी लग्नाची तयारी करण्यात गुंतले आहे.माझ्या दोघी तायड्या मला चिडवून बेजार करत होत्या.त्यांच्या चिडवण्यामुळे मला राग न येता माझ्या अंगावर गोड शिरशिरी उठायची. निखील ने साखरपुड्याच्या दिवशी एकदोनदा माझ्याकडे रोखून बघीतलं होतं तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावर हलकसं हसून होतं.ते रोखून बघणं आत्ताही आठवलं आणि मन मोहरून उठलं.***बघता बघता उद्यावर माझं लग्नं आलं तशी सगळ्यांची गडबड उडाली त्याबरोबर मला चिडवण्याची त्यांच्यात स्पर्धाच लागली होती.आज गृहमख झालं. ऊद्या मेंदी आहे. त्यासाठी दुपारीच मेंदी काढणारीला बोलावलं आहे. माझ्या पक्क्या मैत्रीणी सकाळपासूनच