पुरस्कार

  • 2.4k
  • 948

पुरस्कार काही काही विद्यार्थी असे असतात की शिक्षक कितीही रागात असला तरी त्या विद्यार्थ्यांना शिकवावसं वाटतंच. तसा राग प्रत्येकाला येतच असतो. तसा तो राग शिक्षकांनाही येतोच. अशीच ती एक शाळा. शाळा चांगली होती. विद्यार्थीही चांगलेच होते. मात्र ते गरीब होते व त्या शाळेत शिकविणारा शिक्षक मुकुंद हा मायाळू होता. मुकुंद गरीब परीवारातील होता व तो गरीब परिस्थितीतून शिकला होता. तो जेव्हा शिकत होता. तेव्हा त्याचेजवळ पैसे असायचे नाहीत. त्यावेळेस शाळेत पेपरशुल्क भरावं लागायचं. तसं त्यानं पेपरशुल्क भरलं नाही की त्याच्या शाळेतील शिक्षक त्याच्यामागं तकादा लावायचे. तसं पाहिल्यास त्याच्या घरी त्याच्या वडीलांनी चार जणं व तो एक पाच असे पाच भाऊबहीण