आई पाहिजे (एकांकिका)

  • 2.6k
  • 843

पात्र परीचय-1)आई-40 वर्षे च्या वर. 2)पूर्वा-काॅलेज तरूणी 3)सुलभाताई-पूर्वाची आत्या 4)ठाकुर,गोडसे,राऊत काकू महिलामंडळाच्या सदस्या. (संपन्न घरातला हाॅल,टेबलावर काही पुस्तके व वह्या अस्ताव्यस्त पडल्यात.खुर्चीवर उश्या वाकड्या-तिकड्या दिसताहेत. आई येते व सर्व व्यवस्थित ठेवते. सगळीकडे एकवार नजर फिरवते.) आई- छे---छे काय हा पसारा.? एक वस्तू जागेवर असेल तर शप्पथ! रोज सकाळ-संध्याकाळ हा पसारा आवरावा लागतो. अहो एकच मुलगी आहे तर हा एवडा पसारा ;मुलगी कसली सळसळती बिजली आहे ---बिजली ! पण गोड आहे बर का?---पण अजूनही ही झोपली आहे की काय? पूर्वा----ये पूर्वा अग साडेतीन वाजलेत. ऊठ--ऊठ-- तूला मैत्रीणींना भेटायला जायचंय ना? (पूर्वा डोळे चोळत बाहेर येते.) पूर्वा- अग हे काय ग मम्मी