निषादपर्व

  • 2k
  • 1
  • 567

            निषादपर्व“प्रभासक्षेत्री यादव वीरांचा संहार झाला. बलराम, श्रीकृष्ण यांचीही अवतार समाप्ती झाली. सिंधुसागर कणाकणाने द्वारकापुरी आपल्या उदरात घेऊ लागला. यादवीतून वाचलेले वृध्द, नारीजन आणि बालके यांना पार्थाने द्वारकेतून हस्तिनापुरात आणावे. त्यांचा प्रतिपाळ करावयाची जबाबदारी योगेश्वर श्रीकृष्णानी पार्थावर सोपवलेली आहे...” दारूकाच्या मुखातून हे वृत्त ऐकून पांडव शोकाकुल झाले. श्रीकृष्णांनी सोपविलेले कार्य आपल्या हातून पार पडेल की नाही या शंकेने पार्थ ग्रासला त्याच्या सर्वांगाला कंप सुटला, हृदयाचे स्पंदन वाढले. आपण वृद्ध झाल्याची जाणीव त्याला प्रकर्षाने होऊ लागली. केवळ कर्तव्य भावनेनेच पार्थ प्रवासाला सिद्ध झाला. प्रवास दीर्घ पल्ल्याचा! अरण्य मार्गात हिंस्त्र श्वापदे, दस्यू आणि वनवासी लुटारू यांचाही धोका