पश्चाताप - भाग 3 (अंतिम भाग)

  • 1.8k
  • 840

पश्चाताप भाग तीन महेश हा रुपालीच्या कार्यालयात कार्यरत असलेला अधिकारीच. तो गरीब असल्यानं गावच्या सरकारी शाळेत शिकला होता. तसं पाहिल्यास त्याची कॉन्व्हेटला शिकायची ताकद नव्हती. कारण कॉन्व्हेटचं शुल्क अतोनात होतं व ते शुल्क सर्वसामान्य लोकांना परवडणारं नव्हतं. तस ते शुल्क महेशच्या वडीलांना परवडणारं नसल्यानं त्यांनी महेशचं गावच्या शाळेत नाव दाखल केलं होतं व तो तिथंच हिरीरीनं शिकून आज मोठ्या पदावर गेला होता. कॉन्व्हेटनं त्यावेळेस आपलं बस्तान बसवलं होतं व सर्वसामान्य लोकांना वाटत होतं की कॉन्व्हेटला शिकविल्याशिवाय आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळू शकणार नाही. त्याला अधिकारी बनवता येणार नाही. त्यातच याच काळात शिकवणी वर्गाचंही अति प्रमाणात प्रस्थ वाढलं होतं. मान्यता होती