पश्चाताप - भाग 1

  • 14.8k
  • 2
  • 7k

पश्चाताप या पुस्तकाविषयी 'पश्चाताप' ही माझी सत्यान्नववी पुस्तक. एका कादंबरीच्या रुपानं ही पुस्तक वाचक वर्गापर्यंत पोहोचवतांना तेवढा आनंद नाही. कारण ही पुस्तक पाहिजे त्या प्रमाणात सरस बनली नसेल, असं मला वाटतं. त्याचं कारण म्हणजे माझा तो एक मित्र. मी त्याला फोन करुन यातील कथानक सांगीतलं. त्यावर तो म्हणाला, "मित्रा, यातील कथानक हे तेवढंच भारदस्त दिसत नाही." त्यानंतर मी त्याला विचारलं, "त्याचं कारण म्हणजे याचं कथानक हे सर्वसामान्य आहे. या कथानकातून कोणताच बोध होत नाही. यातील कथानक सर्वसामान्य आहेत. ज्या कथानकाची माहिती सर्वांनाच आहे. नवीन विचारही नाही व कथानकही नाही." ते त्याचं बोलणं. परंतु ते बोलणं मला जरी वाईट वाटत असलं