धन्वन्तरीचा वसा

  • 3.4k
  • 1.1k

धन्वंतरीचा वसाराजा धुवाळ्याला साप चावला. त्याचा चुलता, वाडीतले झिलगे सोबत घेऊन बोंबा मारत भांब्याच्या मांगराकडे आला. दंश करणारं जनावर मारुन त्याने ते बरोबर आणलेलं. जनावर उताणं करुन भांब्या किलकिल्या डोळ्यांनी बघू लागला. “म्हाताऱ्या! अडीच पाराचा हये जनावर.” त्याचा पोरगा गंग्या पटकन म्हणाला. सख्या धुवाळी मान हलवत म्हणाला, “हां हां बराबर दीस उगवोन दोन घंटे झाले असती नसती. उडदळीत जोतां धरलेली हुती. राजो कोपरे मारी हुतो नी ह्या लचांड मेरेसून भायर इला. उजवे पायाच्या आंगठ्याक ढास मारुन जनावर परातला आनी ढास सोडून मेरेतल्या बिळात जावक लागला. राजो निसतो ब्बांव मारुक लागलो. जोतये जोता सोडून धावले.”“राजो बिळाहारी ब्वॉट दाकवित हुतो. परशान् बीळ