अनुबंध बंधनाचे. - भाग 2

  • 6.9k
  • 5.4k

अनुबंध बंधनाचे.....( भाग २ )आज गुरुवार होता. घटस्थापना होती त्या दिवशी, नवरात्रीचा पाहिला दिवस, दरवर्षी प्रमाणे दांडिया मधे बेंजो वाजवण्याची ऑर्डर होती. प्रेम पहिल्यांदा नगरातील मित्रांसोबत तिथे वाजवायला गेला होता. तो कीबोर्ड काढून स्टँड वर लावत होता, तेवढ्यात एक छोटीसी मुलगी त्याच्या जवळ आली आणि त्याला बोलली... हाय... माय नेम इज अंजली...व्हॉट इज युवर गुड नेम...?तो तिच्या सुंदर डोळ्यांमध्ये पहातच राहिला. एकदम गुटगुटीत अशी ती किती गोड दिसत होती, अगदी एखाद्या परीसारखी... लाईट पिंक कलर चा वन पिस घातलेला. त्यावर व्हाईट कलर चे फ्लॉवर होते. गळ्यामध्ये ड्रेसला सुट होणारा नेकलेस, कानामध्ये त्याला मॅच होणारे इअर रिंग, एका हातात पिंक कलर चा