ब्लॅकमेल - प्रकरण 14 (शेवटचे प्रकरण)

  • 2.7k
  • 1.2k

प्रकरण १४ दोन्ही धारवाडकर आणि युक्ता बेहेल तिघांच्या चेहेऱ्यावर तणाव आला आहे हे स्पष्ट जाणवत होतं. “ युक्ता, तुला हे जर्किन बसते का पहा.” पाणिनी म्हणाला तिने ते जर्किन हातात घेतलं आणि अंगात घालायचा प्रयत्न केला तिला ते खूप सैल झालं. “ शुक्लेंदू, तुम्ही या पुढे.” पाणिनी म्हणाला “ अशा प्रकारे खुनी ठरवण्याची पद्धत चुकीची आहे.” तो ओरडून म्हणाला. “ ते कोर्टाला ठरवू दे, तुम्ही फक्त ते घालून दाखवा.” पाणिनी म्हणाला नाईलाजाने शुक्लेंदू ने ते जर्किन अंगावर चढवले.त्याला ते खूप घट्ट झालं. म्हणजे अंगातून आत जाईना. “ आता तुम्ही ” शाल्व ला उद्देशून पाणिनी म्हणाला आणि काही कळायच्या आत शाल्वने