निकिता राजे चिटणीस - भाग १६

  • 2.2k
  • 1.2k

निकिता राजे  चिटणीस   भाग  १६ भाग १५ वरून  पुढे  वाचा ......... इंस्पेक्टर पाटील चिटणीसांच्या घरी जातांना मी म्हंटल “परब तुम्हाला काय वाटत? काय असू शकेल?” “साहेब, सांगण अवघड आहे. बाहेरच्या कोणाची कामगिरी असेल अस वाटत नाही. घरातलाच कोणी असेल असंही वाटत नाही. पण तपास केल्यावर कदाचित काही धागे सापडतील.” – परब म्हणाले.   “बरोबर आहे. बघूया. फॉरेन्सिक टीम ला बोलावलं का?” “हो साहेब. ते पण पोचतच असतील.” – परब.   घरी पोचलो तेंव्हा फॉरेन्सिक टीम ची गाडी उभीच होती आणि सर्व आमची वाट पाहत होते. आम्ही सगळेच आत गेलो. राधाबाई होत्या. मी चौकशीला सुरवात केली “हं राधाबाई काय घडल