हम साथ साथ है - भाग ८

  • 2.5k
  • 1.6k

हम साथ साथ है भाग ८वामागील भागावरून पुढे…त्या दिवशी रात्री जेवणाच्या वेळी सगळे टेबलावर जमले होते. सासऱ्यांची नेहमीप्रमाणे अलिप्त राष्ट्राची भूमिका होती. सासूबाई कायम माईकसमोर भाषण देण्यासाठी उभ्या राहिल्या सारख्या बोलायच्या. त्यांच्या बोलण्याला लक्षात येईल तेथे सासरे "ह.हूं" करायचे बाकी त्यांचे लक्ष जेवणाकडे अधिक असायचे. दीपकही निम्मावेळ श्रोताच असायचा. त्यादिवशी जेवता जेवता अचानक सासूबाईम्हणाल्या, "अरे दीपक मघाशी सुरेशचा फोन येऊन गेला." "काय म्हणत होता?" दीपकने विचारलं पण त्याचं अर्धे लक्ष भरल्या वांग्याच्या भाजीत होते तर अर्धे लक्ष आईच्या बोलण्याकडे. सासऱ्यांचे तर पूर्ण लक्षच भरल्या वांग्याच्या भाजीत होतं. ते म्हणाले,"सुलू तू कशी  भरली वांगी करतेस गं?या बाईला सांग तशी करायला" हे