हम साथ साथ है - भाग ७

  • 2.5k
  • 1.5k

हम साथ साथ है भाग ७मागील भागावरून पुढे…सुभाषराव पेपर वाचत होते त्याचवेळी निलू म्हणजे सुलभाच्या सासूबाई तिथे आल्या.  त्यांना बघताच सुभाषराव म्हणाले" निलू थांब जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे.""काय एवढं महत्वाचं बोलायचं आहे?""गेले आठ दिवस मी बघतोय तु़झी आणि रेवती ची रोज स्वयंपाकावरून किरकीर असते. यामागे काय कारण आहे?""कारण हेच मला त्या बाईच्या हातचा स्वयंपाक आवडत नाही.""चांगला स्वयंपाक करते ती बाई. कशाला उगीचच रोज अन्नाला नावं ठेवतेस?"सुभाष राव"जेवण आवडलं नाही तरी कौतुकच करायचं!" निलू"तू जे वागतेय ते मुद्दाम केल्यासारखं वाटतंय. सुलभा ने स्वयंपाकीण ठेवली म्हणून विरोध करणं चालू आहेनं?" सुभाषराव"असं वगैरे काही नाही.आम्हाला दोघींना तिचा स्वयंपाक आवडत नाही." निलू"आम्हाला म्हणू