हम साथ साथ है - भाग ६

  • 2.8k
  • 1.8k

ऊणीव भाग ६वामागील भागावरून पुढे…रात्रीचं स्वयंपाकघरातील मागचं सगळं आवरून सुलभा आपल्या खोलीत आली. दिपक नेहमीप्रमाणे पुस्तक वाचत होता. खोलीत आल्यावर दिपकशी काहीही न बोलता  सुलभा गादीवर आडवी झाली.दिपकला आश्चर्य वाटलं. कारण सुलभा इतक्या शांतपणे कधीच येऊन झोपत नसे. कुठल्या न् कुठल्या विषयावर दोघांची चर्चा चालत असे. त्याने पुस्तक मिटवून ठेवलं आणि सुलभा जवळ आला."काय ग काय झालं?"सुलभा काहीच बोलली नाही."सुलभा काय झालं सांगशील का त्याशिवाय मला कसं कळेल."सुलभा ने कूस बदलली आणि दिपक कडे बघत म्हणाली,"दीपक मला वाटते या डॉक्टरांच्या डोक्यावर पैसे घालणं आता बंद  करावं,”“का?अगं काही दिवस घालवावेच लागतात.  डाॅक्टरच म्हणाल्या नं. इतक्या चटकन निर्णय घेणे योग्य नाही.” दिपक