हम साथ साथ है - भाग ५

  • 2.7k
  • 1.7k

हम साथ साथ है भाग ३मागील भागावरून पुढे…रात्री सगळे म्हणजे दीपक, दीपकचे वडील सुभाषराव,आई निलीमा बहीण रेवती आणि तिचा नवरा प्रवीण असे सगळे जेवायला बसले होते. सुलभाला यायला उशीर होणार होता त्यामुळे कोणी जेवायला थांबू नका असं तिने सांगीतलच होतं."मला अजीबात आवडत नाही हिच्या हातचा स्वयंपाक." निलीमा म्हणजे सुलभाच्या सासूबाई. म्हणाल्या"मला सुद्धा आवडत नाही." रेवती म्हणाली."काय बोलतेस निलू तू. किती छान वांग्याचं भरीत केलंय.""उगीच काहीतरी बोलू नका सुलभा वर इंप्रेशन मारायला बोलू नका.""मी कशाला तिच्यावर इंप्रेशन मारीन. इंप्रेशन मारायचं असेल तर तुझ्यावर मारीन पण तशी वेळ येत नाही."गंभीरपणे सुभाषराव म्हणाले. पण यावर दीपक आणि प्रवीण दोघंही हसले."हसण्याची काही गरज नाही."