हम साथ साथ है - भाग २

  • 3.5k
  • 2.5k

हम साथ साथ है भाग २रामागील भागावरून पुढे…रेवती हे सासूबांईचं अवघड जागेचं दुखणं आहे हे एव्हाना सुलभाच्या लक्षात आलं होतं. सुलभाचं लग्न झालं तेव्हा रेवती काॅलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. काॅलेजचा अभ्यास, परीक्षा, परीक्षेचं टेन्शन हे फक्त रेवतीच्या बाबतीतच आहे असं सासूबाईंना वाटायचं.एकदा घाईघाईने नाश्ता अर्धवट करून प्लेट तशीच ठेऊन रेवती काॅलेजला पळालीतिच्यामागे सुलभाच्या सासूबाई" अगं बळा नाश्ता पूर्ण करून जा. किती उन्हाची घरी येतेस त्रास होईल तुला."सासूबाईंच्या बाळाने काही ऐकलं नाही.ती तशीच गेली.रेवतीची खरकटी प्लेट बघून सुलभाला राग आला.ती सासूबाईंना म्हणाली" आई रेवतीला तिच्या नाश्त्याची प्लेट घासायला टाकायला सांगा. नाश्तापण अर्धवट ठेवला आहे."" अगं तू बघीतले नं तिला उशीर झाला