लाल छत्री चहा

  • 2.5k
  • 1
  • 735

लाल छत्री चहा कळत्या वयातला म्हणजे 1965 च्या दरम्यानचा काळ हा मध्यम वर्गियांसाठी दुर्भिक्ष्य आणि कमतरतेचा, कदन्न, ओढघस्तीचा काळ. त्या काळी चहा ही आम्हा पोरांसाठीच नव्हे तर गरीब, हातावर पोट असणाऱ्या कामगार वर्ग़ासाठीही चैनीची वस्तू होती. आम्हा मध्यमवर्गिय ब्राह्मणांच्या घरी दिवसातून 4-5 वेळा चहा केला जात असे . पण कामगार वर्गियांच्या घरी असं नव्हतं. म्हणून सकाळी दारात आलेला गडी चहाच्या घोटासाठी रहाटगाडग्यावर अगदी खुशीने पाणी लाटून देत असे, भाजीचा फणस फोडून देणं, खळ्याला चोप देणं किंवा बेगमीसाठी डाळलेल्या गंजीतलं गवत ओढून देणं ही कामं कपभरून मिळणाऱ्या चहाच्या आशेने करीत असे . पोरासोराना सकाळी अनशापोटी कडू कुडेपाक दिला जाई . त्यानंतर