प्राक्तन - भाग 7

  • 3.6k
  • 1.8k

प्राक्तन -७अनिशाने तिचं आवरल्यानंतर अमेय आणि तिने दोघा मायलेकांनी एकत्र जेवण केलं. थोडा वेळ येनकेन गप्पा मारून अमेय अभ्यास करायला त्याच्या खोलीत गेला. तेव्हा अनिशा जरा पडावं म्हणून बेडवर कलंडली. पण यशची विदारक कहाणी काही तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हती. त्याची आठवण येताच तिने फोन हातात घेतला. दुपारचे तीन वाजलेले... जेवण करून औषधं घेतली असतील का त्याने?? फोन करू का.. पण तो झोपला असेल तर झोप मोड होईल ना त्याची.. काय करू असा विचार ती करत होती. अखेर तिने मेसेज करून विचारू असं ठरवलं. आणि तिने त्याला मेसेज वरून विचारणा केली. व्हॉट्सॲप वर मेसेज केल्यावर डबल टीक तर आली नाही म्हणून