प्राक्तन - भाग 6

  • 3.3k
  • 1.8k

प्राक्तन -६ " डॉक्टर काय झालंय यशला...? आता बरा आहे ना तो.." डॉक्टर यशला चेक करून बाहेर पडताच अनिशाने त्यांना विचारलं. " हो आता बरे आहेत ते काळजीचं कारण नाही. पण तुम्ही कोण त्यांच्या मिसेस का?" डॉक्टरांनी तिच्याकडे बघत स्वाभाविकपणे विचारलं. " अं नाही मी त्याची मैत्रिण... त्याला चक्कर आली सकाळी मॉर्निंग वॉक वेळी धावताना म्हणून लगेच घेऊन आले.. " ती कशीबशी थाप मारत म्हणाली. आणि सुदैवाने डॉक्टरांनाही ते पटलं. " अच्छा. पण लो बीपी आणि त्यात काहीही खाल्लं नसावं त्यामुळे अशक्तपणा आलाय. म्हणून हा त्रास उद्भवला. मी काही गोळ्या औषधे देतो ती आणून द्या त्यांना. आणि दुपारपर्यंत डिस्चार्ज मिळेल.