धर्मयोगी - भाग 1 -2

  • 4.7k
  • 1.9k

धर्मयोगी नावाच्या पुस्तकाविषयी धर्मयोगी नावाची पुस्तक वाचकांच्या हाती देतांना मला अतिशय आनंद होत आहे. तशी धर्मावरील मी एक पुस्तक धर्मांतरण नावाची यापुर्वी वाचकांना दिलेली आहे. त्याच अनुषंगानं ही देखील पुस्तक मी वाचकांसाठी खास पर्वणी म्हणून लिहिलेली आहे. ही पुस्तक प्रेमावर आधारीत आहे. असं प्रेम की ज्याची आपण कल्पना करु शकत नाही. प्रेमाविषयी सांगायचं झाल्यास प्रेमाच्या कथा आपण बऱ्याच वाचलेल्या आहेत. बऱ्याच चित्रपटांमधून पाहिलेल्या आहेत. काहींच्या तोंडून ऐकलेल्या आहेत. परंतु असंही एक प्रेमाचं कथानक असू शकते की ज्यानं आपलं मत छिन्नभिन्न होईल. मनात विचारांचं वादळ सुटेल. लोकं तर्क वितर्क करु शकतील. परंतु ते गुपीत प्रेम आहे. आता ते प्रेम कशाचं आहे?