कामीनी ट्रॅव्हल - भाग ४२

  • 1.1k
  • 486

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ४२ हर्षवर्धन आता चांगल्या प्रकारे व्यवसाय सांभाळू लागला होता. तन्मय सुद्धा वयाच्या मानाने खूपच लवकर या व्यवसायात शिरला होता आणि चांगलं काम करत होता. यावर्षी तन्मयचं शिक्षण पूर्ण झालं होतं. कामीनी ट्रॅव्हल्सच्या इतर शाखांमध्ये तन्मय मधून मधून भेट देत असे. या वर्षभरात प्राचीनी ऑफिस मध्ये प्रवेश केला नव्हता. तिने ग्रफिक डिझाईनिंगमध्ये स्वतःला बिझी करून घेतलं होतं. हर्षवर्धन आणि तन्मय या दोघांनी कामनी ट्रॅव्हल साठी खूप धडपड केली. यावर्षी खूप वर्षानंतर उत्तम ट्रॅव्हल कंपनी म्हणून कामीनी ट्रॅव्हल्सला पुरस्कार मिळाला होता. याचे श्रेय अर्थातच हर्षवर्धन आणि तन्मयला मिळालं होतं त्या दिवशी संध्याकाळी हर्षवर्धनने कामिनी बाईंना या पुरस्काराची बातमी दिली