कामीनी ट्रॅव्हल - भाग ४१

  • 1.5k
  • 621

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ४१ प्राची आणि हर्षवर्धन यांचा वाद होऊन जवळपास चार महिने उलटले होते. या चार महिन्यांत बरंच काही घडून गेलं होतं. प्राची अजूनही घरीच होती. तिनी हर्षवर्धनशी बोलणं जवळपास सोडून दिलं होतं. कामीनी बाईं पण हर्षवर्धनशी आवश्यक तेवढंच बोलत. त्यांचा बहुतेक वेळ भय्यासाहेबांकडे लक्ष देण्यात जात असे. भय्यासाहेबांना बघायला जरी केयरटेकर असला तरी बराच वेळ कामात जात असे. आजकाल तन्मय आणि हर्षवर्धन दोघंही ऑफीसमध्ये जायला लागले होते. तन्मयला घरातील वातावरणाची थोडीफार कल्पना आली होती. कामीनी बाईंनी त्याला या वातावरणामागचं कारण सांगीतलं होतं. त्यामुळे तो समजूतीनी कामीनी ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात लक्ष घालू लागला होता. रोज कामीनी बाईंना तन्मय ऑफीसमधल्या गोष्टी