कामीनी ट्रॅव्हल - भाग ४०

  • 1.4k
  • 636

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ४० हर्षवर्धन ऑफीसमध्ये जायला म्हणून तयारी करत असतो. प्राची खोलीतल्याच इझीचेयरवर मागे डोकं टेकवून डोळे मिटून बसलेली असते. हर्षवर्धनचं तिच्याकडे लक्ष गेलं. हर्षवर्धन प्राचीला म्हणाला, "प्राची आज आठवडा झाला तू ऑफिस मध्ये आलेली नाही ऑफिस मध्ये किती कामं खोळंबली आहेत. किती टूर्सचं नियोजन करणं थांबलेलं आहे. कधी येणार आहेस ऑफीसमध्ये? तू फक्त स्वतःच्या मनस्थितीचच कौतुक करत बसणार आहेस?" हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकलं तशी प्राची खुर्चीवरून ताडकन उठली आणि त्याला म्हणाली, "हर्षवर्धन गेली अनेक वर्ष तुझ्या मनस्थितीला सांभाळत मी जगले. माझ आयुष्य राहीलच कुठे माझ्यासाठी? मी वेगळं म्हणून काही जगलीच नाही. सतत हर्षवर्धन ..हर्षवर्धन... हर्षवर्धन. फक्त हर्षवर्धनसाठी जगले.