कामीनी ट्रॅव्हल - भाग ३९

  • 1.4k
  • 732

कामीनी ट्रॅव्हल्स पर्व भाग३९ वासंती आणि अशोक हे दोघेही भैया साहेबांची तब्येत बघायला प्राचीच्या घरी आले. दोघांनाही भैय्यासाहेबांना बघून शॉक बसतो. भैय्यासाहेब खूप थकलेले दिसतात. अशोक विचारतो "आता कसं वाटतंय?" भैय्यासाहेब म्हणाले, "थोडावेळ बसलो,चाललो तर थकायला होतं." यावर अशोक म्हणतो " फार तडतड करू नका.काही दिवस फक्त आराम करा. हळुहळू तब्येत ठीक होईल." यावर भय्यासाहेब स्मीत करतात. अशोक आणि वासंती समोरच्या खोलीत येतात.तिथे कामिनी बाई आणि त्यांच्या गप्पा चालू होतात. कामिनी बाई म्हणाल्या, "माहिती नाही काय झालं असं अचानक प्राचीला. पण ती परवापासून अस्वस्थ आहे. तिला ऑफिस मध्ये जायची इच्छा होत नाही. जेवायची इच्छा होत नाही. ती नेहमीसारखी बोलत सुद्धा